शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्त्री रत्न फाउंडेशन भोसरी यांच्या वतीने ‘मेलडी मेकर्स’ या विशेष संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. अशोककुमार सराफ प्रस्तुत इंटरनॅशनल आर्टिस्ट्स यांच्या सादरीकरणातून गवळीनगर व परिसरातील नागरिकांसाठी जुन्या-नव्या गाण्यांची सुंदर मेजवानी या कार्यक्रमात अनुभवता येणार आहे. माजी नगरसेविका सौ. प्रियांका प्रविण बारसे आणि श्री. प्रविण सुरेश बारसे यांच्या सुमारे ३५ वर्षांच्या वैवाहिक सहजीवनाचा आनंद रसिकांबरोबर साजरा करण्याच्या निमित्ताने हा सांगीतिक सोहळा आयोजित करण्यात आला असून, गोड आठवणींना उजाळा देणारी गीते सादर केली जाणार आहेत.
हा कार्यक्रम गुरुवार, दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दुर्वांकुर लॉन्स, आळंदी रोड, भोसरी येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रियांका बारसे आणि प्रवीण बारसे यांनी केले असून, समस्त बारसे परिवाराच्या वतीने रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आनंद घ्यावा, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.



