शबनम न्यूज
वि. वि. आमच्या संगम शिक्षण संस्था संचालित, ज्ञानदेव बालक मंदिर व वृद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, आदर्श बालक मंदिर या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा. श्री.भाऊसाहेब भोईर माजी नगरसेवक पिं. चिं. मनपा, मा. श्री.दिलीप ज्ञानदेव चव्हाण संस्थापक, संगम शिक्षण संस्था व वृद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ हे होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.दिलीप सोनिगरा अध्यक्ष सोनीगरा ज्वेलर्स पिंपरी चिंचवड, ह. भ. प. किसन चौधरी महाराज व सन्माननीय उपस्थिती मा. श्री.संजय कुलकर्णी सर हे लाभलेले होते.
वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ग. दि. माडगूळकर नाट्यगृह आकुर्डी या ठिकाणी दु. १२ ते ०३ या वेळेमध्ये पार पडला. प्रथमतः मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन झाले. शाळेतील विद्यार्थिनींनी अतिशय सुमधुर स्वरामध्ये पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. वर्षभर शाळेमध्ये विविध उपक्रम, क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. विनोद मोळके सर यांनी वार्षिक अहवाल वाचन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह. भ. प. किसन चौधरी महाराज यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना पसायदानाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. विद्यार्थी कसा असावा व पालकांनी कशाप्रकारे आपल्या मुलांना योग्य ती शिकवण द्यावी यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. भाऊसाहेब भोईर साहेब यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यार्थीदशेत मोबाईलचा वापर किती धोकेदायक आहे. यावर मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे संस्थापक मा. श्री. दिलीप चव्हाण सर यांनी आपली शाळा कशा प्रकारे सुसंस्कृत विद्यार्थी घडवते याबद्दल माहिती दिली व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी शाळेतर्फे पुरवण्याची ग्वाही दिली.
यानंतर विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. प्रथमतः गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये मराठी सणांवर आधारित गाणी प्रत्येक वर्गामध्ये घेण्यात आलेली होती. यामध्ये रक्षाबंधन, रंगपंचमी, होळी, दहीहंडी, दिवाळी, दसरा, जागरण गोंधळ, शिवजयंती, भोंडला, मंगळागौर यासारख्या सणांवर नृत्य सादर करण्यात आले व सर्वात शेवटी आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या जीवनावर आधारित नाटिका व नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सादरीकरण उत्तम झाल्यामुळे संस्थेतर्फे सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शेवटी आभार व्यक्त करून वंदे मातरम घेऊन कार्यक्रम पूर्ण झाला. या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी कुंजीर यांनी केले. शुक्रवार १२ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांनी महिनाभर केलेल्या मेहनतीसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.



