शबनम न्यूज
कधीतरी आपण हातात माईक घेऊन आपल्याला आवडणारे गाणे म्हणावे, आपण गात असताना साथीला त्या गाण्याचे संगीत वाजत असावे आणि समोर आपल्याला प्रोत्साहित करणारा,कौतुक करणारा प्रेक्षक असावा असे वाटते की नाही ? भले देवाने गाता गळा दिला नसेल पण प्रत्येकाला गावेसे वाटतेच. हीच प्रत्येकाच्या मनातली सुप्त इच्छा ओळखून अनिकेत प्रभू सोशल वेल्फेअर ग्रुपच्या वतीने खास थेरगाव मधील १८ वर्षावरील नागरिकांसाठी ‘कराओके’ ही अभिनव स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये थेरगाव नोकरी, व्यवसायात अडकल्याने आपली आवड जोपासता येऊ न शकलेल्या पण थोडे फार अंगभूत गायन कौशल्य असलेल्या नवोदित गायिकांसाठी सुर-ताल ‘कराओके’ हि स्पर्धा हक्काचं व्यासपीठ ठरलं १०० पेक्षा अनेक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला व आपली कला सादर केली,काही गाण्यामुळे श्रोते भावुक ही झाले तर काही गाण्यामुळे खळखळून हसले..
या स्पर्धेत अ गटात वयोगट १८ ते ४५ मध्ये प्रथम क्रमांक श्लोक चावीर,द्वितीय क्रमांक संकेत गंधी, तृतीय क्रमांक दत्ता संकपाळ उत्तेजनार्था मध्ये सुनिता साळुंखे,अर्चना पाटील,अर्चना होनराव,साक्षी जाधव,आकाश चव्हाण तसेच ब गटात वयोगट ४५ ते खुला प्रथम क्रमांक सतिश चांदवलकर द्वितीय क्रमांक देवेंद्र बडगुजर, तृतीय क्रमांक प्रशांत राजमाने, उत्तेजनार्थ मध्ये भारद्वाज खैरनार,सुधाकर कुलकर्णी,राजेंद्र देशपांडे,प्रशांत आडरकर,प्राजक्ता साळी
या कार्यक्रमाचे नियोजन व उत्कृष्ट सुत्रसंचालन अशोकजी जाधव, सुभाष चव्हाण, व अनिल घोडेकर यांनी केले..
तसेच पर्यवेक्षक म्हणून गायक श्री विलास गाधडे, सौ स्मिता पाटील, व सौ सुरेखा कापसे
यांनी काम पाहिले कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती वरीष्ठ पत्रकार अनिलजी वडघुले, ज्येष्ठ नागरिक संघाचे विष्णुपंत तांदळे,ॲड चंद्रकांत गायकवाड,भाई प्रभु,हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ निशा प्रभु,अनिकेत प्रभु मित्र परीवारानी प्रयत्न केले..



