प्रभाग क्रमांक 24 मधील महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी
पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील प्रभाग क्रमांक २४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, करिश्मा सनी बारणे , शालिनी कांतीलाल गुजर, गणेश दत्तोबा गुजर यांच्या पुढाकाराने भव्य होम मिनिस्टर हा खेळ रंगला पैठणीचा हा महिलांचा आवडता कार्यक्रम दिनांक १४ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कै. मोरू महादू बारणे क्रीडांगण, वनदेव नगर थेरगाव येथे संपन्न होत आहे.
प्रभाग क्रमांक २४ च्या महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांतर्गत गप्पागोष्टी, मनोरंजन चे खेळ ,बहारदार कार्यक्रम तसेच आकर्षक बक्षिसे जिंकण्याची महिलांना संधी उपलब्ध झाली आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धाकातून भाग्यवान महिलेस मानाची पैठणी देण्यात येणार आहे.
या खेळ रंगला पैठणीचा उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू ही देण्यात येणार आहे. यानिमित्ताने भव्य आकर्षक लकी ड्रॉ काढण्यात येणार असून या लकी ड्रॉ मध्ये पाच सोन्याच्या नथ, पाच मिक्सर, पाच गॅस शेगडी, व पाच स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षीस ठेवण्यात आली आहे.
या महिलांचा आवडता असलेला खेळ, खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात विजेत्या महिलांना मौल्यवान असे बक्षीस देण्यात येणार आहे यामध्ये प्रथम क्रमांक स्कुटर, द्वितीय क्रमांक स्कूटर, तृतीय क्रमांक स्कूटर, याचबरोबर पाच शिलाई मशीन व पाच पिठाची गिरणी असे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम प्रसिद्ध निवेदक अक्षय मोरे सादर करणार असून थेरगाव परिसरातील जास्तीत जास्त महिला भगिनी यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे व कार्यक्रमाचा आनंद लुटावा मनोरंजन सोबतच बक्षिसे जिंकावी असे आवाहन माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, करिश्मा सनी बारणे , शालिनी कांतीलाल गुजर, गणेश दत्तोबा गुजर यांनी केले आहे.



