पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही दिवसात घोषित होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर भाजप वतीने संपूर्ण शहरातील एकूण 32 प्रभागातील इच्छुक उमेदवारांची चाचणी करत त्यांचे इच्छुक उमेदवारी अर्ज मागविले. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 22 मधून विनोद तापकीर यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केला.
पिंपरी चिंचवड शहर भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्याकडे विनोद तापकीर यांनी आपला इच्छुक उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.
प्रभाग क्रमांक 22 च्या सर्वांगीण विकासासाठी आपण ही महानगरपालिका निवडणूक लढविणार व प्रभागाचा मोठ्या प्रमाणात विकास करणार, प्रभागातील रस्ते, वाहतूक समस्या, वीज समस्या, पिण्याच्या पाण्याची , तसेच मूलभूत सुविधा यांच्या समस्या असे अनेक समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. अनेक वर्षापासून प्रभागाचा विकास खोळंबला आहे. प्रभागाच्या विकासाला गती मिळावी यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे सांगत , आपल्याकडे प्रभागाच्या विकासाचे अनेक मुद्दे आहेत, आपण हे सर्व विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे विनोद तापकीर यांनी सांगितले.
तसेच पिंपरी चिंचवड शहर भाजपचे प्रक्ष श्रेष्ठी यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असून मला प्रभाग क्रमांक 22 मध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी पक्षाच्या वतीने मिळेल, असा ठाम विश्वास विनोद तापकिर यांनी व्यक्त केला आहे.



