शबनम न्यूज| प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड येथील नामांकित अशा इंडियन डेंटल असोसिएशन(पिंपरी-चिंचवड), पुणे ची वार्षिक सर्वसाधारण सभा, हॉटेल नियोवूड्स, वाल्हेकरवाडी दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आली यात २०२६ ची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
डॉ. विनायक कुमार शेट्टी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
डॉ. गौरव विसपुते यांची सचिवपदी तर डॉ. दिपाली पाटेकर यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.
डॉ. विनय कुमार शेट्टी मूळचे केंजूर, तालुका-उडपी,कर्नाटक येथील सुशिक्षित परिवार श्री व सौ. केंजूर भास्कर शेट्टी आणि विनोदा शेट्टी यांचे सुपुत्र.
डॉ. विनय कुमार शेट्टी यांनी आपले दंत वैद्यकीय शिक्षण हे मंगळूर येथील के.वी.जी. दंत वैद्यकीय महाविद्यालय येथून यशस्वीपणे पूर्ण केले.
सण २००२ पासून पिंपरी-चिंचवड येथील नामांकित वाय.सी.एम सरकारी रुग्णालय येथून आपले दंत वैद्यकीय सेवेला सुरुवात केली.
डॉ. विनय कुमार शेट्टी गेले २३ वर्ष पिंपरी-चिंचवड दंत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत व सामाजिक कार्यात आपले योगदान देत आहेत.



