spot_img
spot_img
spot_img

थोर क्रांतिकारक हुतात्मा बाबू गेनू यांना महापालिकेच्या वतीने अभिवादन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शहीद  बाबू गेनू यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी विदेशी कपडे भारतात विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी, त्याचा विरोध करताना दिलेल्या बलीदानाने देशात सर्वत्र क्रांतीची बीजे पेरली गेली, स्वातंत्र्यपूर्व काळातील अशा घटनांमधून  स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना देश स्वतंत्र करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.

       पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थोर स्वातंत्र्यसैनिक शहीद बाबू गेनू यांच्या शहीद दिनानिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या.   

अभिवादन प्रसंगी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपलेखापाल अंकुश कदम, स्वप्निल भालेराव, आरेखक हनुमंत टिळेकर तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

      शहीद बाबू गेनू हे इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात निर्भयपणे उभे राहिलेले शूर क्रांतिकारी म्हणून ओळखले जातात. विदेशी मालाच्या बहिष्कार टाकण्यासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान ते शहीद झाले.देशासाठी स्वतःचा जीव अर्पण करणाऱ्या बाबू गेनूंचे बलिदान भारतीय स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक दिशा देणारे ठरले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!