शबनम न्यूज | प्रतिनिधी
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी–चिंचवड परिसरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर सोमनाथ मोहन तापकीर यांच्या पुढाकाराने तर डी. वाय. पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या पार पडले.
कार्यक्रमास प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये जिल्हा सरचिटणीस मधुकर बच्चे, मा. नगरसेविका सविता खुळे, ज्योती भारती, नीता पाडळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रेखा काटे, मंडल अध्यक्षा अनिता चोपडे,
अश्विनी कांबळे, ज्योती शिलेवंत, अलका भोसले, प्रकाश लोहार, कैलास सानप, प्रमोद ताम्हणकर, रमेश काळे,
हर्षल नढे, सचिन काळे, धर्मा पवार, विनोद तापकीर, अशोक टेकाळे, विलास पाडाळे, गणेश ढाकणे,
शहाजी अत्तार, नबीलाल मुल्ला, प्रदीप शिंदे, भरत ठाकूर, पंकज मिश्रा, सागर चौधरी, रवी दाभाडे, डॉ. मनोहर शिंदे, चंद्रकांत तापकीर, मा. नगरसेवक बाबा त्रिभुवन, नरेश खुळे, भरत जोशी, प्रशांत कदम,
शुभम शिंदे, स्वप्निल रोंगे, अजित धारूरकर, रुपेश तापकीर, सुरेश पवार, योगेश नडे, मोहन चव्हाण, महेश भोईर, युवा नेते सचिन बाबाजी काळे, बबलू शेख, भैय्या कांबळे, ज्ञानेश्वर तुकाराम काळे, तसेच संजय गायके यांसह परिसरातील सुज्ञ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोफत तपासणी शिबिरात 380 नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर 288 नागरिकांनी स्मार्ट कार्ड काढून घेतले.
कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल आयोजकांनी सर्व मान्यवर आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.



