spot_img
spot_img
spot_img

नागपूर अधिवेशन ; राष्ट्रसुरक्षेबाबत तडजोड नको; कारवाई करा!

भाजपा आमदार महेश लांडगे यांची विधानसभा सभागृहात मागणी
चिंचवडमध्ये पाकिस्तान बनावटीची सौंदर्य प्रसाधने प्रकरणाची चौकशी करा

शबनम न्यूज

पिंपरी-चिंचवड शहरात मार्च- 2025 मध्ये पाकिस्तान बनावटीच्या सौंदर्य प्रसाधनांचा मोठा साठा जप्त झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती, हा मुद्दा आता थेट राष्ट्रसुरक्षेच्या दृष्टीने ऐरणीवर आला आहे. “शत्रू घराच्या उंबऱ्यावर येऊन ठेपला आहे. आपल्या शहरात शिरण्याचा प्रयत्न करतोय. राष्ट्रसुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करु नये, ही गंभीर बाब आहे,” असे मत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत व्यक्त केले.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अर्धा तास चर्चेच्या सत्रामध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करताना, पाकिस्तान निर्मित माल शहरात कसा पोहोचला, या मागची साखळी व संभाव्य राष्ट्रविघातक कारवायांचा शोध घेणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. “देव–देश–धर्मासाठी आम्ही काम करतो. राष्ट्रसुरक्षा हा वादाचा नव्हे तर ठोस कारवाईचा विषय आहे,” असे लांडगे म्हणाले.

आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गेल्या दोन–तीन वर्षांत 70 हून अधिक बांगलादेशींना अटक केली असून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तरीही ही कारवाई अधिक कठोर करण्याची मागणी त्यांनी सभागृहात मांडली. शहरात बांगलादेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य वाढत असल्याचा मुद्दा त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केला.राष्ट्रीय सुरक्षा, इंद्रायणी नदी प्रदूषण आणि अवैध भंगार व्यवसाय यासंबंधी पिंपरी-चिंचवड महापालिका व पोलिस विभागाने कुदळवाडी परिसरात मोठी अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली होती. तब्बल 900 एकरातील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. भंगार व्यवसायिकांपैकी काहींना शहरातून बाहेर हुसकावण्यात आल्यानंतर, हेच घटक शहरालगतच्या गावांमध्ये बस्तान बसवण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक गावांनी ठराव करून “गाव हद्दीत बेकायदेशीर भंगार दुकाने नकोत,” असा एकमुखी निर्णय घेतला आहे.

राज्य सरकार स्वतंत्र समिती नेमणार…

“पाकिस्तान निर्मित प्रसाधनांची शहरातील उपस्थिती ही केवळ तस्करी नव्हे, तर सुरक्षा दृष्टीने गंभीर इशारा आहे. अवैध नागरिक, बेकायदेशीर व्यवसाय व संशयास्पद हालचालींवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी करत आमदार लांडगे यांनी सरकारला जागरूकतेसह निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन केले. राज्यातील राष्ट्रसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अधिवेशनात केंद्रस्थानी आला. यावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी सकारात्मक आश्वासन दिले. चिंचवडसह पुणे परिसरात पाकिस्तान बनावटीची सौंदर्यप्रसाधने सापडली आहेत. त्याची चौकशी आणि उत्पादन कुठे होते? याचा शोध घेण्यासाठी लवकरच स्वतंत्र समिती नेमण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया:

“पाकिस्तान बनावटीचा माल पिंपरी-चिंचवडमध्ये कसा पोहोचतो? हा केवळ तस्करीचा मुद्दा नाही, तर राष्ट्रसुरक्षेला थेट धोका आहे. शत्रू आपल्या उंबऱ्यावर येऊन ठेपला आहे. लव्ह जिहाद, धर्मांतर, लॅन्ड जिहाद त्यानंतर व्होट जिहाद आणि आता कॉस्मेटिक जिहादपर्यंतचे संकट निर्माण झाले. देव–देश–धर्मासाठी काम करणारे आम्ही तडजोड करणार नाही. राष्ट्रविघातक कृत्यांना ठेचून काढण्यासाठी सरकारने तातडीने कठोर आणि निर्णायक कारवाई करणे गरजेचे आहे.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!