शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने आयोजित ठाकरे शिवसेना चषक भव्य हाफ पीच टूर्नामेंट स्पर्धा 2025 ला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन युवा सेने उपपशहर प्रमुख निखिल उमाकांत दळवी यांनी केले असून स्थानिक तरुणांना खेळाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा व त्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश या स्पर्धेमागे आहे.

प्रभाग क्रमांक १४ मधील मान्यवरांनी या स्पर्धेला विशेष भेट देत स्पर्धेचे आयोजन, खेळाडूंचा उत्साह आणि मैदानावरील वातावरणाची पाहणी केली. मान्यवरांच्या आगमनाने खेळाडूंचा उत्साह आणखी वाढला. उपस्थितांनी उत्तम नियोजन आणि शिस्तबद्ध आयोजनाबद्दल निखिल दळवी यांचे कौतुक केले.
टूर्नामेंटमध्ये विविध संघांनी सहभाग नोंदवला असून पुढील काही दिवस रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत. समाजातील तरुणांमध्ये क्रीडा संस्कार रुजवण्यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
या स्पर्धेमुळे प्रभागात क्रीडा संस्कृतीला अधिक बळ मिळणार असून नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.



