शबनम न्यूज
पिंपरी – पिंपरी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीची दोन पिस्तुल जप्त केली आहेत. ही कारवाई बुधवारी (१० डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता पिंपरी ब्रिज येथे करण्यात आली.
पोलिसांनी कॉन्स्टेबल समोर ढवळे यांनी बुधवारी (दि. १०) याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलासह त्याने ज्या व्यक्तीकडून पिस्तूल आणल्या तो पप्पी सिंग (वय ३५, रा. मध्य प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.



