spot_img
spot_img
spot_img

हॅपिनेस स्ट्रीट २.०’ चा धमाका: आनंद आणि ऊर्जेचा महापूर पुन्हा एकदा!

शबनम न्यूज: प्रतिनिधी

डब्बू आसवानी यांच्या प्रयत्नातून ‘हॅपिनेस स्ट्रीट २.०’ हा सामुदायिक आणि कौटुंबिक फिटनेस उत्सव पिंपरीकरांसाठी पुन्हा एकदा येत आहे. ‘फिट है तो हिट है!’ या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम १४ डिसेंबरपासून सलग चार आठवडे, प्रत्येक रविवारी सकाळी ६ ते ८:३० या वेळेत पिंपरी येथील ओपन लॉन्स रोडवर आयोजित करण्यात आला आहे.

 

नागरिकांना धावपळीतून वेळ काढून योग, झुम्बा, सायकलिंग, स्केटिंग, बॅडमिंटन अशा ४० हून अधिक ऍक्टिव्हिटीजचा केवळ २.५ तासांत आनंद घेता येणार आहे. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रौप्य महोत्सवी विवाहित जोडप्यांना त्यांच्या लग्नाचा क्षण पुन्हा अनुभवण्याची खास संधी मिळणार आहे. १०० हून अधिक गिफ्ट्स आणि लाईव्ह शोजसह हा आनंद, आरोग्य आणि समाजाचा उत्सव पिंपरीच्या ‘ओपन लॉन्स रोड’ ला पुन्हा जिवंत करणार आहे. पिंपरीकरांनी या सकारात्मक बदलाचा भाग होऊन उत्साहात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!