शबनम न्यूज | प्रतिनिधी
सागर खंडूशेठ कोकणे युवा मंच वतीने पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 27 मधील खास लाडक्या बहिणींसाठी महिलांचा आवडता कार्यक्रम ‘खेळ रंगला पैठणीचा न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या रविवारी दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता कापसे लोन्स रहाटणी, पुणे येथे सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते अभिनेते रामभाऊ जगताप असणार आहेत. या कार्यक्रमात खास महिला- भगिनींसाठी लाखोंची बक्षिसे भेट म्हणून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात विजेत्या महिला-भगिनींना लाखोंची बक्षिसे व मानाची पैठणी भेट देण्यात येतील. यामध्ये प्रथम क्रमांकावर होंडा एक्टिवा व मानाची पैठणी, दृतिय क्रमांकावर 43 इंची टीव्ही, तृतीय क्रमांकावर फ्रिज, चतुर्थ क्रमांकावर वाशिंग मशीन व पाचवा क्रमांक मायक्रो ओव्हन तसेच महा लकी ड्रॉ मध्ये जिंकणाऱ्या व प्रश्नमंजुषा अंतर्गत जिंकणाऱ्या 50 महिलांना पैठणी भेट म्हणून देण्यात येणार आहे व सहभागी स्पर्धक महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
सदर कार्यक्रम येत्या रविवारी संपन्न होणार असून या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता सागर भाऊ कोकणे जनसंपर्क कार्यालय, विमल गार्डन समोर, गोडांबे चौक रहाटणी येथे अर्ज जमा करायचे आहेत. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला-भगिनींनी सहभागी होण्याचे आवाहन युवा नेते सागर खंडूशेठ कोकणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.



