मतदार यादीत नाव, मतदान कार्डाचे स्मार्ट कार्ड, आधार लिंक उपक्रम
शबनम न्यूज | प्रतिनिधी
३ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादी नुसार मतदार यादीतील मतदारांची नावे तपासणी करून घेण्यासाठी माजी नगरसेविका प्रियांका ताई प्रवीण बारसे यांच्या वतीने उपक्रम राबविण्यात येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत आपले नाव आहे का? हे तपासण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मतदार यादीतील नावांची खात्री, प्रभाग क्रमांकाची माहिती तसेच हरवलेल्या मतदार ओळखपत्राबाबत मार्गदर्शन, मोफत मतदान स्मार्ट कार्ड योजना प्रभाग क्र. ५ मधील मतदारांसाठी सुरु करण्यात आली आहे. सदर योजना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मा. नगरसेविका प्रियांका ताई बारसे यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना आधारकार्ड लिंक असलेला मोबाइल सोबत ठेवणे आवश्यक असून, सर्व सुविधांचा लाभ विनामूल्य उपलब्ध करून दिला जात आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी त्यांचा जनसंपर्क कार्यालय, आदर्श शाळेच्या शेजारी, दिघी रोड, भोसरी, पुणे – ३९ येथे नागरिकांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा वेळ सकाळी ११.०० ते सायं ५.०० असणार आहे.
नागरिकांना मतदार यादीतील नाव तपासून घेणे, दुरुस्ती करणे व स्मार्ट कार्डची नोंदणी करण्याची ही एक उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली असून परिसरातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.



