शबनम न्यूज
रावेत – रावेत पोलिसांनी थेट मध्यप्रदेशमध्ये जाऊन धडक कारवाई करत एका आरोपीला पकडले असून ११० ग्रॅम सोनेही जप्त केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे यांनी केले असून त्यांच्या सोबत पो.ह.वा. अशीष बोटके आणि पो.शी. निखिल कपले या अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पथकाने तांत्रिक तपास, सखोल चौकशी, नेटवर्क ट्रेसिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. तपासादरम्यान पिंपरी चिंचवड आरोपीने परिसरातून पलायन करून मध्यप्रदेशात आश्रय घेतल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ कारवाई केली. अनोळखी प्रदेश, स्थानिक माहितीचा अभाव आणि कायदेशीर प्रक्रिया ही मोठी आव्हाने असतानाही पथकाने अत्यंत कौशल्याने सापळा रचला आणि सहआरोपी महिलेस ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे सर्व हालचाली डिटेक्ट करून लवकरच मुख्य आरोपीलाही ताब्यात घेतले जाणार आहे. या कारवाईदरम्यान गुन्ह्यातील सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ही तपासातील मोठी कामगिरी मानली जाते. या धाडसी कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे स्थानिक नागरिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे आणि विविध सामाजिक संघटनांकडून कौतुक होत आहे.



