२५ लाखांचे दागिने जप्त ; युनिट तीनची कामगिरी
शबनम न्यूज
पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनने एका घरफोडी प्रकरणात अट्टल चोरांना ४८ तासांत जेरबंद केले. आरोपींकडून २५ लाख १३ हजार ५९८ रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केली. मोहसीन शौकतअली शेख (वय ३२, रा. लोहियानगर सत्यकाम, स्कुल जवळ, एम ब्लॉक, मेरठ, उत्तर प्रदेश), उदयवीर मलखानसिंग सहानी (वय ३६, रा. गल्ली नं. ३, प्रतापनगर, जयभिम नगर, मेरठ, उत्तर प्रदेश) आणि विनय कुमार गंगासरन (वय ३४, रा. ग्राम बिजोली ठाणा, खरखोदा, मेरठ, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरठ, उत्तर प्रदेश येथून दुचाकीने पिंपरी चिंचवड शहरात येऊन ते घरफोडी करीत असे. व नंतर परतीच्या प्रवासात दुचाकी टेम्पोमध्ये ठेवून असे. पोलिसांनी आरोपींकडून २५ लाख १३ हजार ५९८ रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम, पांढऱ्या रंगाचा टेम्पो (किंमत १३ लाख रुपये), होन्डा शाईन दुचाकी आणि घरफोडीसाठी वापरलेली साहीत्य जप्त केली आहे. आरोपींकडून दिघी, चाकण, काळेवाडी आणि सांगवी येथील घरफोडी उघडकीस आल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत गोसावी, सुनिल जावळे, तांत्रिक सहाय्यक प्रकाश ननावरेपोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, सागर सुर्यवंशी, श्रीधन इचके, संदिप सोनवणे, मनोज साबळे, रुषिकेश भोसुरे, अजित रुपनवर, स्वप्निल महाले, योगेश कोळेकर, शशिकांत नांगरे, बाळासाहेब भांगले, सुंदर थोरात, समीर काळे, सुधीर दांगट, दिलीप राठोड, तुषार वराडे, राजकुमार इघारे, निखील फापाळे, प्रदीप राळे यांच्या पथकाने केली आहे.



