शबनम न्यूज
मनाई आदेशाचा भंग करून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन काडतुगे बेकायदेशीररीत्या बाळगणाऱ्या व्यक्तीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई माउलीनगर डुडुळगाव, देवराई सोसायटी समोर मंगळवारी (दि. ९) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
रितेश राजेश भोसले (वय २६, रा. त्रिरत्न कॉलनी, लक्ष्मीनगर दक्षिण, मोशी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार निखिल बाळासाहेब वर्षे (वय ३४) यांनी मंगळवारी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरीतून पोलिसांनी मंगळवारी (दि. ९) एका तरुणास पिस्तुलासह अटक केली आहे. बिलाल रेसुद्दीन इनामदार (वय २७, रा. ईडन टॉवर सोसायटी, ए/१-४०३, शंकर कलाटेनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक विनायक गणपती पाटील यांनी मंगळवारी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश जारी केला होता. आरोपीने हा आदेश भंग करत ६१ हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे मॅगझीनसह पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत केले. संत तुकारामनगर पोलीस तपास करीत आहेत.



