शबनम न्यूज
गांधी दर्शन शिबिराचे रविवार दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी गांधीभवन, कोथरूड, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० या वेळेत संपन्न होणाऱ्या या शिबिरात तीन व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. ‘सर्व समावेशक समाजकारण आणि राजकारण’ या विषयावर संभाजी ब्रिगेडचे पैगंबर शेख, ‘परिवर्तनाच्या प्रक्रियेत आंदोलनाचे महत्त्व काल आणि आज’ या विषयावर युवक क्रांतीदालाचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते व आम आदमी पार्टीचे माजी प्रांताध्यक्ष रंगा राचुरे आणि ‘सामाजिक कार्यातील माझा प्रवास शोध आणि बोध’ या विषयावर चैतन्य संस्थेच्या संस्थापक विश्वस्त सुधा कोठरी यांची व्याख्याने होतील. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांतीदालातर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी संपर्क अॅड. स्वप्निल तोंडे- ९९२३५२३२५४, तेजस भालेराव- ९१७२४८७०१९. या गांधीदर्शन शिबिरास नागरिकांनी आवर्जुन यावे असे आवाहन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले आहे.



