शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी, पिंपरी–चिंचवड शहराची वर्किंग कमिटी जाहीर करण्यात आली आहे. या कमिटीतील सर्व निवडण्यात आलेल्या सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
घोषित वर्किंग कमिटी पुढीलप्रमाणे आहे –
प्रकाश हगवणे – अध्यक्ष
ज्योती शिंदे – उपाध्यक्ष
कमलेश रणवरे – सदस्य
सुरेश बावणकर – सदस्य
यशवंत कांबळे – सदस्य
स्वप्निल जेवळे – सदस्य
अभिजीत कदम – सदस्य
ही संपूर्ण कमिटी प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके आणि शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणार आहे. लोकाभिमुख भूमिका, पारदर्शकता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारित काम करत, ही कमिटी शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी सक्रियपणे पुढाकार घेणार आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी पिंपरी–चिंचवड शहरात भरघोस यश मिळवेल, असा दृढ विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. शहराचा शाश्वत विकास, स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, आणि प्रत्येक नागरिकाचा आवाज प्रभावीपणे पोहोचवणे हे या नव्या वर्किंग कमिटीचे प्रमुख उद्दिष्ट राहील.



