spot_img
spot_img
spot_img

प्रभागाच्या विकासासाठी अमृताताई नवले सज्ज!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधून सामाजिक कार्यकर्त्या तसेच भारतीय जनता पार्टीच्या माजी अ-प्रभाग अध्यक्ष सौ. अमृता ताई विक्रांत नवले-ढोरे या आगामी महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. “प्रभागातील विकास कामांच्या जोरावर, जनतेच्या विश्वासावर आणि आतापर्यंतच्या सामाजिक योगदानाच्या बळावर ही निवडणूक लढविणार आहे,” असे अमृता ताई नवले-ढोरे यांनी सांगितले.

अमृता ताई नवले यांच्या माहेरी राजकीय वातावरण आणि सासरी देखील राजकीय वातावरण असल्याने त्यादेखील सामाजिक कार्यात अग्रेसर झाल्या. आपल्या सामाजिक कार्याने त्यांनी नावलौकिक मिळविले, आता त्या प्रभाग क्रमांक 19 मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

अमृता ताई नवले यांनी प्रभाग क्रमांक 19 मध्ये मागील १० ते १२ वर्षांत अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला व विविध वयोगटातील नागरिकांसाठी त्यांनी अनेक उपयुक्त कार्यक्रम राबविले असून, महिलांना स्वावलंबनाचे भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘आरी वर्क’ व इतर कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन करण्यात त्यांचे विशेष योगदान आहे.

कोरोना काळात प्रभागातील सामान्य कुटुंबांना मदतीचा हात देण्यातही अमृता नवले यांचा पुढाकार राहिला आहे. कोरोना काळातील रुग्णांना वेळेवर दवाखान्यात जागा मिळत नव्हती, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याचबरोबर प्रभागातील सामान्य कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत औषध उपयोगी साधनांचेही वाटप केले. यामध्ये सॅनिटायझर ,मास्क व प्रभागात सॅनिटायझर फवारणीही केली आणि कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणे ही कठीण असताना अमृता नवले यांनी अनेक कुटुंबांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करत एक संवेदनशील व प्रभावी नेतृत्व म्हणून आपली एक सक्षम अशी ओळख निर्माण केली.

प्रभाग क्रमांक 19 मधील सर्वसामान्य कुटुंबांना तसेच सोसायटी धारकांना भाजी मार्केट उपलब्ध करून देण्यात अमृता नवले यांचा मोठ्या प्रमाणात पुढाकार आहे. दळवी नगर भागात भाजी मार्केट सुरू होणार होते परंतु ते झाले नाही, त्यामुळे येथील नागरिकांना भाजी मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी अमृता नवले यांनी पुढाकार घेतला व त्यांच्या पुढाकाराने आज दळवी नगर भागात आठवडे बाजार ही संकल्पना मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. या आठवड्या बाजारात प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांची भाजी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, या माध्यमातून अमृता नवले यांच्यामुळे येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील भाजी विक्री करण्यासाठी एक मोठे मार्केट उपलब्ध झाले आहे.

प्रभागातील नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि दैनंदिन गरजांवर त्वरित उपाय शोधण्याचे काम त्या सातत्याने करत आहेत. अमृता युथ फाउंडेशनच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी प्रभागात अनेक विकास कामे, सेवा उपक्रम आणि लोकसहभागाचे कार्यक्रम राबवून स्थानिक नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. यामध्ये पाणीपुरवठा प्रश्न, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, डीपी बसविणे असे विविध उपक्रमांचा समावेश आहे.

यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना त्यामार्फत पात्र लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. आयुष्मान भारत – जनआरोग्य योजना : नागरिकांना आरोग्य कार्ड, उपचार व रुग्णालय संबंधित माहिती पुरविणे, प्रधानमंत्री जनधन योजना : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत, स्वच्छ भारत मिशन : प्रभागातील स्वच्छता उपक्रम, कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती, मुख्यमंत्री सागर मित्र योजना / जलसंधारण व पर्यावरण उपक्रम : प्रभागातील हरित उपक्रमांना चालना, महिला व बालविकास योजनांचे मार्गदर्शन : महिलांसाठी प्रशिक्षण, सशक्तीकरण व स्वावलंबन कार्यक्रम, केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजना : वृद्ध, दिव्यांग, विधवा लाभ योजनांचे मार्गदर्शन या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे व त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रभागातील नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे.

आगामी निवडणुकीत प्रभाग 19 च्या विकासाला गती देणे, नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि महिलांसाठी अधिक संधी निर्माण करणे हे आपले प्रमुख लक्ष्य असल्याचे सौ. अमृता ताई नवले-ढोरे यांनी स्पष्ट केले. प्रभागातील नागरिक नक्कीच त्यांना संधी देतील यात शंका नाही .

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!