प्रभाग क्रमांक 28 च्या सर्वांगीण विकासासाठी लढणार निवडणूक
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर भाजप पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रभाग क्रमांक 28 मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सौ. अनिताताई संदीप काटे यांनी आपला इच्छुक उमेदवारी अर्ज सर्वसाधारण महिला या प्रभागातून दाखल केला.
शहर भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्याकडे सौ. अनिताताई संदीप काटे यांनी आपला इच्छुक उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.
प्रभाग क्रमांक 28 च्या सर्वांगीण विकासासाठी आपण निवडणूक लढविणार असल्याचे सौ अनिता संदीप काटे यांनी सांगितले आहे तसेच शहर भाजपचे पक्षश्रेष्ठी नक्कीच आपल्याला प्रभाग क्रमांक 28 मधून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सौ. अनिता संदीप काटे या गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक 28 मध्ये सामाजिक काम करत आहेत. चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या संचालिका म्हणून त्यांनी अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रातही काम करत आहे.
प्रभागातील नागरिकांचे तसेच सामान्य कुटुंबांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या नेहमी पुढाकार घेत असतात, त्यामुळे येथील मतदारांचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला आहे. प्रभागातील विविध समस्या, रस्त्यांच्या समस्या, वाहतूक समस्या अशा अनेक समस्यां सोडविण्यावर काटे यांनी भर दिला आहे. सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करताना त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यांची समाजसेवेची व सामाजिक कार्याची कामगिरी सातत्यपूर्ण असल्याने यावेळी भाजप पक्षाकडून त्यांना नक्कीच उमेदवारी मिळेल, असे सांगण्यात येत आहे.




