-
गणेश विलास साने मनपा निवडणूक रिंगणात
-
स्वर्गीय दत्ता काका साने यांचे पुतणे गणेश विलास साने निवडणूक लढविणार
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नव्या चेहऱ्यांचे आगमन सुरू झाले असून, यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत आणखी एका तरुण पिढीतील उदयोन्मुख, युवा नेतृत्वाने राजकारणात पाऊल टाकण्याची घोषणा केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नवी एन्ट्री! माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांचे पुतणे गणेश विलास साने उमेदवारीला सज्ज झाले आहे.
महाराष्ट्र राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने विविध पक्षांमध्ये सत्ता-समीकरणांच्या हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत.
पिंपरी – चिंचवड मध्ये देखील नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील जनतेची अनेक वर्ष सामाजिक – राजकीय सेवा केलेले पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांचे पुतणे गणेश विलास साने यांनी देखील आपण यंदाची पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक ११ मधून लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.
लहानपणापासूनच दत्ता काका साने यांच्या लोकसंपर्क, कार्यशैली आणि समाजसेवेचा जवळून अनुभव घेतलेल्या गणेश साने यांनीही जनतेसाठी काम करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. आता ते प्रत्यक्ष राजकीय रिंगणात उतरल्याने प्रभाग ११ मधील नागरिकांकडून उत्सुकता आणि सकारात्मक प्रतिसाद उमटताना दिसत आहे.
लहानपणापासून आपले काका दत्ता साने यांच्या लोकसेवेच्या तालमीत समाजकारणाचे धडे गिरवत असताना, आपणही काकांसारखे जनतेच्या सेवेसाठी काम करण्याचा मानस त्यांनी उराशी बाळगला आणि आज प्रत्यक्षात ते निवडणुकीच्या रिंगणातून जनतेच्या सेवेसाठी पुढे येताना दिसत आहे.
गणेश साने यांच्या पुढाकाराने आता पर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोरोना काळात त्यांची केलेली सामाजिक कामे उल्लेखनीय आहेत. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, रुग्णवाहिका लोकार्पण, नोकरी महोत्सव , यासारखे सामाजिक उपक्रम यासोबतच नेहमी अडचणीत आलेल्या प्रत्येक नागरिकाला मदत करणे हा गणेश साने यांचा नैसर्गिक स्वभाव यामुळेच ते एक युवा आणि उदयोन्मुख नेतृत्व म्हणून समोर आले आहे. स्वर्गीय दत्ता काका साने यांच्या सोबत राहून त्यांना मिळालेले राजकीय व सामाजिक कार्याचे धडे ही त्यांची जमेची बाजू आहे.
राजकारणात युवकांनी पुढे यावे, सध्याच्या राजकारणात युवकांना मोठी संधी आहे, आजच्या शिक्षित व सक्षम युवकांमध्ये दूरदृष्टी आहे आणि त्यांच्या याच दूरदृष्टीतून एक आदर्श समाज, एक आदर्श शहर घडविण्यासाठी गणेश साने सारखे युवक राजकारणात पुढे यायला हवे. गणेश साने यांना आगामी महानगरपालिका निवडणूक ही मोठी संधी असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
गणेश विलास साने हे आता निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहे. सामाजिक काम करताना शहराचा विकास होणे महत्त्वाचे आहे. आणि राजकारणात येऊनच शहराचा विकास आपण योग्य प्रकारे करू शकतो. त्यामुळेच आपण आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचे गणेश साने यांनी सांगितले आहे.
दत्ता काका साने यांच्या जडणघडणीतून सज्ज झालेले गणेश विलास साने नक्कीच येणाऱ्या काळात आपल्या कामातून प्रभाग क्रमांक ११ मधील जनतेच्या मनावर ठसा उमटवतील अशी चर्चा सध्या जनतेमधून होताना दिसत आहे.



