शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहराचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख निखिल दळवी यांना धक्काबुक्की व शिवीगाळ झाली, संबंधित विरोधात निखिल दळवी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल दळवी हे आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाकरे शिवसेना चषक हाफ पीच क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धा आयोजित करत आहेत, त्यांनी यासाठी विठ्ठलवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील, संत तुकाराम महाराज पालखी तळ हा आरक्षित भूखंड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखेरीयकार्य कार्यालयाकडून रीत सर्व पत्र व्यवहार करून त्याचे रीतसर भाडेही भरून क्रिकेट टूर्नामेंट साठी घेतला. या ठिकाणी मंडप टाकण्यात सुरुवात करत असतानाच या परिसरातील गिरीश गोपाळ कुठे यांनी दादागिरी करत निखिल दळवी यांना मंडप टाकण्यास मनाई केली व वाद सुरू केले या वादातून त्यांनी निखिल दळवी यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यानुसार निखिल दळवी यांनी निगडी पोलीस ठाण्याला लेखी तक्रार दिली आहे.



