शबनम न्यूज | प्रतिनिधी
गांजा विक्री प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून ५०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई अजंठानगर मधील सी-१०० पत्राशेड परिसरात सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर आसाराम सोनवणे (वय ३३, रा. पत्राशेड सी-१००, अजंठागनर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार राहुल बाबुराव गायकवाड यांनी निगडी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथक गस्त घालत असताना आरोपी सोनवणे हा गांज्याचा साठा बाळगून विक्रीसाठी उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने छापा टाकून आरोपीला रंगेहात पकडले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचा ५०० ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणाचा अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.



