शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला असून पारा अचानक खाली घसरला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये थंडीचे प्रमाण कमी झाले होते. परंतु पुन्हा थंडी वाढू लागली असून मंगळवारी सायंकाळी नोंदविलेल्या गेल्या २४ तासांतील आकड्यांनुसार शहरातील किमान तापमान १४.७ अंश इतके नोंदविले आहे.
मागील आठवड्यात किमान तापमान २० अंशांपर्यंत आणि कमाल तापमान ३० अंशांच्या वर जाऊन पोहचले होते. त्यानंतर हळू-हळू थंडीचा जोर वाढू लागला असून किमान तापमान १५ अंशांच्या खाली गेले आहे. परंतु कमाल तापमानात मात्र जास्त घट झालेली नाही अजूनही शहरातील कमाल तापमान ३० अंशांच्या आसपास आहे.



