सौ. पूजा सागर बारणे यांच्या पुढाकाराने महिलांसाठी खास उपक्रम
शबनम न्यूज | प्रतिनिधी
थेरगाव परिसरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये खास महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदर उपक्रम हा सौ. पुजा सागर बारणे यांच्या पुढाकाराने संपन्न होत आहे. पूजा सागर बारणे या शिवसेना शिंदे गटातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे.
या पार्श्वभूमीवर थेरगाव परिसरातील महिलांसाठी हा खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून क्षण आनंदाचा, खेळ पैठणीचा हा उत्साहाने भरलेला मनोरंजन कार्यक्रम शुक्रवार दि. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता थेरगाव येथील हॉस्पिटल समोरील मैदानात संपन्न होत आहे.
यामध्ये सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
या खेळामध्ये विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार असून प्रथम पारितोषिक फोर व्हीलर व मानाची पैठणी तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस स्कूटर तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस टीव्ही व चौथ्या क्रमांकाचे बक्षीस वाटर प्युरिफायर आणि पाचव्या क्रमांकाचे बक्षीस कुलर व सहाव्या क्रमांकाचे बक्षीस ओव्हन तर सातव्या क्रमांकाचे बक्षीस गॅस शेगडी व आठव्या क्रमांकाचे बक्षीस मिक्सर अशी आकर्षक व किमतीवान व मौल्यवान बक्षीसे देण्यात येणार आहे.
हा क्षण आनंदाचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम प्रसिद्ध निवेदक अक्षय रविंद्र मोरे सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजिका सौ पुजाताई सागर बारणे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की महिलांना या उपक्रमाद्वारे मनोरंजन व खेळाचा आनंद मिळावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच घर प्रपंचाची जबाबदारी सांभाळताना महिलांना कुठेतरी हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच महिला मनोरंजन च्या माध्यमातून एक विशेष आनंद देण्याचा प्रयत्न करत असल्याचे पूजा सागर बारणे यांनी सांगितले.



