शबनम न्यूज | प्रतिनिधी
समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी राज्य सरकारने तत्काळ अबकड आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आज नागपुरात विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व युवा आमदार अमित गोरखे आणि आमदार जितेश अंतापूरकर, आमदार कृपाल तुमाने आणि आमदार विक्रम काळे यांनी केले. आमदारांनी वेगळा पोशाख परिधान करून आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले.
५९ जातींच्या वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आरक्षणाची अंमलबजावणी विलंब न लावता तात्काळ करण्यात यावी. शिक्षण, नोकरी आणि सामाजिक न्यायाच्या संधींपासून मोठ्या प्रमाणावर समाजातील घटक वंचित राहत आहेत.
सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांनंतरही ठोस निर्णय न घेतल्याने समाजात नाराजी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार अमित गोरखे यांनी स्पष्ट केले की, आरक्षण हे केवळ धोरणात्मक प्रकरण नसून वंचित समाजाच्या अस्तित्वाचा व भविष्याचा प्रश्न आहे.माझा लढा बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाला १००% न्याय मिळवून देण्याकरता आहे.
एस. सी. आरक्षण मिळून देखील माझे जर काही बांधव वंचित राहत असतील तर मी त्यांच्या हक्का करता मी लढणारच. त्यांनी या लढ्याला आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करत अबकड समाजाच्या हक्कांसाठीचा संघर्ष पुढील काळात अधिक व्यापक होईल, असे संकेत दिले.



