शबनम न्यूज | प्रतिनिधी
सदाशिव पेठ येथील रमेश डाईंग इमारतीच्या टेरेसवर आज अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी जवानांकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, धुराच्या प्रचंड प्रमाणामुळे परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीतील काही भाग रिकामे करण्यात आले असल्याची माहिती मिळते.



