शबनम न्यूज | प्रतिनिधी
अवैधरित्या पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. ७) रात्री सिद्धार्थनगर, मामुर्डी येथे करण्यात आली. आशीष दत्तात्रय भालेराव (वय २७, रा. साईनगर, देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार हर्षद जयवंत कदम यांनी रविवारी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आरोपीने देशी बनावटीचे ५१ हजार रुपये किंमतीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस बाळगले होते. आरोपीला ताब्यात घेऊन शस्त्र जप्त केले आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहे.



