मंगळवारपासून करता येणार ऑनलाइन, ऑफलाइन अर्ज
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुकांना आज (मंगळवार) पासून ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असल्याची माहिती महानगरप्रमुख राजेश वाबळे यांनी दिली. २१ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीची शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागनिहाय शिवसेनेचे काम सुरु आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. महापालिका क्षेत्रातील ३२ प्रभागातील शिवसेना इच्छुक उमेदवारांनी https://www.shivsenapimprichinchwad.com यावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. तर, ऑफलाइन पद्धतीनेही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. वाल्हेकरवाडीतील जुना जकात नाका येथील पक्ष कार्यालयात अर्ज जमा करावेत, असे आवाहन महानगरप्रमुख राजेश वाबळे यांनी केले आहे.
अर्जदाराचे संपुर्ण नाव, विधानसभेचे नाव, प्रभागाचे नाव, प्रभाग क्रमांक, मतदार यादीतील भाग व अनुक्रमांक, आरक्षण प्रवर्ग ( सर्वसाधारण ,ओबीसी,एस.सी.,एस.टी), जात वैधता प्रमाणपत्र छायांकित प्रत,जन्म दिनांक,वय,शिक्षण, आधारकार्ड,पक्षाचा क्रियाशील व प्राथमिक सदस्य क्रमांक इत्यादींसह आपला कार्यअहवाल जोडणे आवश्यक आहे.







