शबनम न्यूज | प्रतिनिधी
शाहूनगर परिसरातील अथर्व सोसायटी व शुभम सोसायटी, गंधर्व सोसायटी व गौरीशंकर सोसायटी येथील ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग कामाचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळा आज पार पडला. हे काम *आमदार अमित गोरखे यांच्या विकास निधीमधून* करण्यात आले असून नागरिकांच्या सुविधेसाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
या शुभारंभ सोहळ्यात आमदार *अमित गोरखे* यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंते अविनाश देवकर, जुनियर अभियंते अशोक जाधव, माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे, सुप्रियाताई चांदगुडे, अरुणा ताई घोळवे, रोहिणी रासकर, तुषार हिंगे, केशव घोळवे, कुशाग्र कदम, योगेश बाबर दिपाली करंजकर, कैलास दुर्गे, विशाल काळभोर, कैलास कुटे, गणेश लंगोटे, राजाभाऊ दुर्गे, शाकिर शेख, अजित भालेराव, संदीप थोरात, संदीप चव्हाण, विलास सपकाळ सुर्यकांत मोहिते, अविनाश पाटील, राहुल नाईक, सोनावले, सुधीर चव्हाण, तानाजी पवार, पाटील डी. बी, वसुले आर एस, दारकुडे एस जी, आमने सर, नवले काका, वाडेकर काका, मोहिते सर, धरम वाघमारे, संभाजी नाईकनवरे, विशाल कदम, सतीश क्षीरसागर, राजेश हजारे, काळूराम साकोरे उपस्थित होते.* सोसायट्यांचे चेअरमन, सचिव व सर्व सभासद देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी सुरू असलेल्या सुविधा विकासकामांना मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे. काळभोरनगर व आसपासच्या भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम साहित्य, विद्यानगर तसेच काळभोर नगर मधील अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते, पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकणे, ड्रेनेज प्रणालीचे बळकटीकरण तसेच आवश्यक ठिकाणी वीजवाहिन्यांची उभारणी अशी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ही सर्व कामे आमदार अमित गोरखे यांच्या विकास निधीतून कार्यान्वित होत असून शहराच्या सर्वांगीण विकासाला नवा आयाम मिळत आहे.
“परिसरातील प्रत्येक नागरिकाला स्थिर विद्युतपुरवठा मिळणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असल्याने वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगसारखी कामे अत्यंत गरजेची आहेत. या कामामुळे भविष्यातील तांत्रिक अडचणी दूर होतील आणि नागरिकांना अधिक सुरक्षित, सुविधा मिळतील. लोकांच्या गरजा ओळखून अशा विकासकामांना आम्ही कायम प्राधान्य देत राहू. शहराच्या विकासात आम्ही कुठेही काही कमी पडू देणार नाही.”
-आमदार अमित गोरखे







