शबनम न्यूज | प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशन २०२५ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, भाजपचे अभ्यासू तरुण, शिक्षित आणि नव-चर्चित तरुण आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीची अधिकृत घोषणा विधानपरिषद सभापती मा.राम शिंदे यांनी सभागृहात केली.
पुणे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते, मंत्री आणि केंद्रीय पातळीवर काम पाहिलेले मान्यवरांची परंपरा आजवर कायम राहिली आहे. या गौरवशाली परंपरेत आणखी एक अभिमानाची भर घालत, आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. विधानपरिषदेत सर्वमान्य आणि संतुलित कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या गोरखे यांच्या नेतृत्त्वाला पुन्हा एकदा सभागृहातील सर्वांनी एकमुखाने मान्यता दिल्याने, पुणे जिल्ह्यातून हा मान मिळवणारे ते नवे इतिहासकर्ते ठरले आहेत.
विधानपरिषदेच्या कामकाजात शिस्त, सौजन्य आणि पारदर्शकता यांचा ठसा उमटवत तालिका सभापतीपदाची जबाबदारी दुसऱ्यांदा सांभाळण्याची संधी मिळणे ही संपूर्ण राज्यासाठी तसेच संपूर्ण समाजासाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे. या निवडीमुळे पुणे जिल्ह्याच्या विधायक नेतृत्वाची परंपरा अधिक बळकट झाली असून, आगामी काळातही हेच नेतृत्व सभागृहात मंत्री म्हणून पाहायला मिळेल, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्ते तसेच समाजाकडून व्यक्त केली जात आहे.
या निवडीवर प्रतिक्रिया देताना आमदार अमित गोरखे म्हणाले :
*”मा. सभापती राम शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि जबाबदारीची बाब आहे. तालिका सभापतीपद ही केवळ एक पद नाही, तर विधानपरिषदेच्या कार्यवाहीतील शिस्त, प्रक्रियात्मक पारदर्शकता आणि संयमाचे प्रतिनिधित्व करणारी भूमिका आहे. या पदाचा योग्य मान राखण्यासाठी आणि सभागृहाच्या कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे योगदान देईन
“सभागृहात दुसऱ्यांदा मला हे पद मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो माझ्यासाठी अनमोल आहे. मी सभागृहातील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानतो, ज्यांनी या निवडीला सहमती दर्शवली.”
“विशेषत: महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आशीर्वादामुळेच मी आज या जबाबदारीच्या ठिकाणी उभा आहे. आपण दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवीन.”
आमदार अमित गोरखे यांना त्यांची वक्तृत्वशैली, मुद्देसूद अभ्यास, आणि जनतेशी असलेली थेट नाळ यासाठी ओळखले जातात. शासनाच्या अनेक समित्यांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, सध्या राज्याचे उवा धोरण समितीवर त्यांची निमंत्रित सदस्य म्हणून नुय्क्ती करण्यात आली.
या नियुक्तीमुळे विधानपरिषदेत भाजपच्या युवा शिक्षित नेतृत्वाला बळ मिळाले असून, सभागृहात नवा ऊर्जा प्रवाह निर्माण होईल, असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला आहे.







