spot_img
spot_img
spot_img

महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक,संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

थोर समाजसुधारक संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

     महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

       यावेळी सह शहर अभियंता अनिल भालसाखळेजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिकमाजी नगरसदस्य बन्सी पारडेपुणे महसूल विभागाच्या राज्य समन्वय समितीचे सदस्य ड. विशाल डोंगरे,सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश अंबिकेअनिल राऊतविनीत राऊतसंजय जगनाडे,सुनील डोंगरेप्रदीप सायकर,दिलीप चौधरीसंतोष साखरेप्रथमेश अंबेरकरअभिजित भोसलेराहुल खानविलकरसोनाली खानविलकरप्रवीण खानविलकरप्रणाली खानविलकरविजय अंबेरकरविनिता अंबेरकररवींद्र हरसुलकरविनीत राऊतविजय महाडिकरोहित राऊत,राजाराम वंजारे,तसेच महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

   यावेळी उपस्थितांनी आम्हीभारताचे नागरिकलोकशाहीवर निष्ठा ठेवूनयाद्वारे प्रतिज्ञा करतो कीआपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्तनिःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्मवंशजातसमाजभाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू”, अशी मतदानाची शपथ घेतली आणि येत्या महापालिका निवडणुकीत १०० % टक्के मतदान करण्याचा निर्धारही व्यक्त केला,प्रफुल्ल पुराणिक यांनी मतदान शपथेचे वाचन केले.

        यावेळी अभिवादन प्रसंगी बोलताना विशेष अधिकारी किरण गायकवाड म्हणाले की,जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संत जगनाडे महाराज यांनी केले. संत जगनाडे महाराजांच्या व्यापक विचारांचा वारसा भावी पिढीने जोपासावा.या माध्यमातून सूजाण नागरिक घडण्यास मदत होणार असून देश बळकट होण्यास मदत होणार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहनही गायकवाड यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!