शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील गवळीनगर भागात राष्ट्र प्रेम नगर या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून ड्रेनेज लाईन नादुरुस्त झाले होते, या नादुरुस्त ड्रेनेज लाईन मुळे रस्त्यावर सांडपाणी येत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. सगळीकडे दुर्गंधी पसरली होती.
या ड्रेनेज लाईनचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिक्स होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे सर्वांचे लक्षात आलं.

सदर तक्रार या भागातील कार्यक्षम अशा माजी नगरसेविका प्रियांका ताई प्रवीण बारसे यांच्याकडे आली, त्यांनी या कामात नेहमीप्रमाणे तत्परता दाखवत सदर ठिकाणचे ड्रेनेज लाईनचे दुरुस्तीचे आदेश संबंधित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य विभागाला दिले. तसेच या ठिकाणची पिण्याची पाईपलाईन नवीन टाकण्यात आली , या परिसरातील सर्वांना पिण्याच्या पाण्याचे नवीन कनेक्शन देण्यात आले, सदर ठिकाणी सिमेंटचे पाईप प्राधान्याने टाकण्याच्या सूचना प्रियांका ताई प्रवीण बारसे यांनी केल्या तसेच आतून बाहेरून चेंबर प्लास्टर
करण्यास ही सांगितले. याचबरोबर त्वरित सदरील ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला सकारात्मकता दाखवत आज सदर ड्रेनेज लाईन चे काम सुरू करण्यात आले. त्याचा शुभारंभ प्रियंका ताई बारसे यांच्या हस्ते तसेच परिसरातील महिला भगिनी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सदर ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागणार आहे. त्यानंतर लगेच त्यावर कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती प्रियांका ताई बारसे यांनी दिली. याप्रसंगी या कामासाठी जलनिसारण विभागाच्या अभियंत्या प्रियांका मस्के यांचे सहकार्य लाभले असल्याचे प्रियांका ताई बारसे यांनी सांगितले. याचबरोबर यावेळी प्रियांका ताई बारसे यांनी परिसरातील महिला, नागरिक यांच्याशी संवाद साधून इतर समस्या जाणून घेतल्या.







