शबनम न्यूज | प्रतिनिधी
ईश्वराने सर्व काही करण्याची प्रत्येकात ताकद दिली आहे ,तुम्ही स्वतःला काय समजता, आपल्या आवडत्या क्षेत्रात किती मेहनत घेता .त्यावर सर्व काही अवलंबून असते. प्राण्यांची बुद्धी कमी असते त्यांना खानपान समजते. ज्यांची कृती, विचार चांगला आहे .जो प्रामाणिक आहे .खोटे बोलत नाही. निस्वार्थ भावनेतून सेवाभाव करतो. स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे नुकसान करत नाही. जो स्वार्थी नसतो तो चांगला माणूस असतो. पण खोटं काम करून फसवणूक करणारा द्रवरुपी अथवा समाजात , प्रतिष्ठा असणारा मग तो कितीही मोठा असला , तरी तो चांगला माणूस नसतो. तुम्हाला आपले जीवन कशासाठी आहे हे उमजले पाहिजे. इतरांसाठी निरपेक्ष भावनेने जे जे मदत करतात, या जगतात माझ्या मते तेच खरे जिवंत असतात .तुम्ही तुमच्या भावी आयुष्यात हजारो लाखोच्या मनावर प्रभाव पाडण्याचे ध्येय व स्वप्न पहावे व महान माणूस आपल्या आवडत्या क्षेत्रात बनावे, असे आवाहन दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या वतीने आयोजित प्रतिभा सृजन व्याख्यानमालेचे उद्घाटन त्याच्या हस्ते झाले व याला जीवन ऐसे नाव या विषयावरील प्रथम पुष्पगुंफताना श्री महाजन आपल्या व्याख्यानात बोलत होते .यावेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा ,संस्थापक डॉ दीपक शहा , खजिनदार डॉ भूपाली शहा, संचालिका डॉ तेजल शहा, प्राचार्या डॉ क्षितिजा गांधी ,डॉ वनिता कुऱ्हाडे, डॉ पौर्णिमा कदम, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांकरिया ,एम बी ए चे संचालक डॉ सचिन बोरगावे, मुख्याध्यापिका डॉ वृंदा जोशी , नाना शिवले , प्रतिभा स्कूल सोमाटणे फाटा च्या मुख्याध्यापिका प्रा सुनिता फडके समवेत प्राध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने व्याख्यानासाठी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ दीपक शहा म्हणाले ,मोबाईलमुळे आजकाल विद्यार्थ्यांमध्ये वाचण्याचा व ऐकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांना आयुष्यात वेळीच दिशा मिळावी. विविध क्षेत्रातील तज्ञ व्याख्यात्यांचे व्याख्यान ऐकण्याची संधी उपलब्ध व्हावी , यासाठी संस्थेच्या 19 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रतिभा सृजन व्याख्यानमालेचे आयोजन यावर्षी करण्यात आले. तसेच यापुढे दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षिका शबाना शेख, समन्वयीका डॉ सुनीता पटनाईक, जस्मीन फरास , प्रा वैशाली देशपांडे यांनी इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडून एक लाख 51 हजार रुपये जमा केले. त्याच्या धनादेश दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक
यजुर्वेंद्र महाजन यांच्याकडे त्याच्या संस्थेतील अंध , अपंग , कर्णबधीर विद्यार्थ्यासाठी सुपूर्त करण्यात आला.
व्याख्यानाची प्रस्तावना डॉ वनिता कुऱ्हाडे यांनी केली . सुत्रसंचालन प्रा वैशाली देशपांडे यांनी केले .







