शबनम न्यूज | प्रतिनिधी
आम आदमी पार्टी प्रभाग क्र. 16 च्यावतीने विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रावेत येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात बोधिसत्व बुद्ध विहार, रावेत येथे सामूहिक बुद्ध वंदना घेऊन झाली. या निमित्ताने संविधान प्रतीचे वाटप करून नागरिकांना घटनादत्त मूल्ये, समानता, बंधुता व न्याय या तत्त्वांचे स्मरण करून देण्यात आले. त्यानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रावेत येथे बाबासाहेब आंबेडकर चौकात पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग 16 अ चे मा. विक्की रोहिदास पासोटे आणि प्रभाग 16 चे अधिकृत उमेदवार मा. शिवकुमार बसवराज बनसोडे उपस्थित होते. तसेच युवा नेते रघु गव्हाळे, अंकुश डोंगरे, राजकुमार आडोळे, दत्ता गायकवाड, सामाजिक नेते भगवान तुपसमुद्रे, नंदू शेजुळे, सुभाष म्हस्के, शिंदे काका, नागेश गायचोडे, युवराज बनसोडे, प्रमोद शिंगे, अनिल डोलारे, शिवानंद भाले, परशुराम शिवशरण, गुरप्पा कुट्टमनी, मोरे काका आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून बाबासाहेबांच्या सामाजिक समतेच्या, प्रबोधनाच्या आणि संविधानिक मूल्यांच्या विचारांना पुनः दृढ करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.



