संघर्षातून घडलेला, विचारांनी प्रेरित आणि समाजकारणासाठी झटणारा विद्यार्थी युवा नेता म्हणजे अभिजित तानाजी कदम
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील शबनम न्यूज मीडिया ग्रुप यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा “मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार–२०२५” यंदा सामाजिक कार्यात सातत्यपूर्ण योगदान देणारे विद्यार्थी नेता अभिजित तानाजी कदम यांना मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे. समाजप्रेरित कार्य, विद्यार्थी प्रश्नांवरील भक्कम भूमिका आणि युवांच्या नेतृत्वाला दिशा देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला.
अभिजित कदम यांनी आपल्या बालपणापासून संघर्ष आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत स्वतःमध्ये सकारात्मकता, कर्तव्यभाव आणि समाजभान रुजवले. शिक्षणासोबतच सामाजिक जाणिवा वाढवत त्यांनी विद्यार्थी, गरजू आणि वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबवले. न्याय, पारदर्शकता आणि सामाजिक उत्तरदायित्व या मूल्यांचे पालन करत त्यांनी विद्यार्थी चळवळीला नवी ओळख दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विद्यार्थी, तरुण आणि स्थानिक प्रश्नांवर त्यांनी नेहमी अग्रक्रमाने आवाज उठवला आहे. शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांचे हक्क, महिला सुरक्षेचे प्रश्न, तसेच युवकांसाठी रोजगार आणि करिअर मार्गदर्शन या क्षेत्रात त्यांनी सातत्याने काम केले आहे. सामाजिक प्रबोधन, जनजागृती मोहीमा आणि स्थानिक स्तरावर दिलेली सक्रिय उपस्थिती यामुळे अभिजित कदम हे तरुणांमध्ये एक विश्वासार्ह नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत.
आज ते विद्यार्थी आघाडी अध्यक्ष, आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड या पदावर काम करत असून विद्यार्थी हितासाठी लढा, सामाजिक सहभाग आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
‘संघर्षातून घडलेले आणि समाजासाठी झटणारे विद्यार्थी युवा नेतृत्व’ अशी ओळख मिळवणारे अभिजित तानाजी कदम हे आगामी काळात अधिक जोमाने समाजकार्यात योगदान देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.







