शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मधील भाजपच्या इच्छुक उमेदवार अनिताताई संदीप काटे यांनी सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांच्या सोबत विविध सोसायट्यांमध्ये भेट देत नागरिकांसोबत संवाद साधला.
या संवाद दौऱ्यात स्थानिक प्रश्न, सुविधा आणि प्रभागातील अडचणी याबाबत रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात आपली मते व्यक्त केली.

दौऱ्यात प्रमुखत्वाने पाणीपुरवठ्याची समस्या, वारंवार खंडित होणारी ड्रेनेज लाईन, वाहतूक कोंडी निर्माण करणारी अपुरी पार्किंग सोय, निकृष्ट किंवा बंद पडलेल्या स्ट्रीटलाईट्स तसेच कंपाउंड व सोलर यांसारख्या मूलभूत सुविधा यावर चर्चा झाली.
अनेक सोसायट्यांमध्ये पाणीप्रश्न गंभीर असून नागरिकांना पर्यायी सोयींचा अवलंब करावा लागत आहे. नागरिकांच्या
प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देत अनिताताई काटे यांनी सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्याचे सोसायटीधारकांना आश्वासन दिले. विकासकामांसाठी योग्य पाठपुरावा करून प्रभागातील सुविधा सुधारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
नागरिकांशी झालेला हा संवाद सकारात्मक ठरला असून प्रभागातील विकासासाठी काटे दाम्पत्यांच्या पुढाकाराचे रहिवाशांनी स्वागत केले आहे.



