शबनम न्यूज | प्रतिनिधी
दत्त जयंतीच्या पावन पर्वानिमित्त सौ. नम्रता रवि भिलारे यांच्या वतीने थेरगाव परिसरातील भाविक भक्तांसाठी महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले. परिसरातील 16 नंबर बस स्टॉपजवळ तसेच काळेवाडी फाटा येथील विविध मंदिरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भक्तांनी प्रसाद ग्रहण करत दत्तमय वातावरणाचा आनंद घेतला. सामाजिक ऐक्य वृद्धिंगत व्हावे आणि धार्मिक परंपरा जोपासल्या जाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
स्थानिक नागरिकांनी सौ. नम्रता रवि भिलारे यांच्या उपक्रमाचे कौतुक करत दत्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
सौ नम्रता रवि भिलारे या महिलांचे सक्षम नेतृत्व म्हणून सर्वांना परिचित आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक 23 मधून त्या निवडणूक लढविणार आहेत. त्यांचे सामाजिक कार्य, प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिकांमध्ये त्यांच्यावर असलेला विश्वास, प्रशासन व शासकीय कामकाजाची माहिती, कार्य करण्याची तत्परता या सर्व गुणांमुळे सौ नम्रता भिलारे या प्रभागात आगामी काळात नक्कीच लोकप्रतिनिधी म्हणून विकास व उज्वल भविष्यासाठी काम करतील, अशा प्रतिक्रिया नागरिकांच्या वतीने या निमित्ताने व्यक्त होताना पहावयास मिळत आहे.




