शबनम न्यूज | प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथील भाषा विभाग व आय.क्यू.ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने “भाषा व साहित्यामधील भाषांतराची भूमिका” या विषयावर एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद गुरुवार, दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या संभाजीनगर, चिंचवड येथील दुसऱ्या कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात येत आहे.
राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मा. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सह-सचिव, उच्च शिक्षण, रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या शुभहस्ते होणार आहे. मा. श्री. संजोगजी वाघेरे-पाटील, सदस्य, जनरल बॉडी, रयत शिक्षण संस्था, सातारा उद्घाटन समारंभाचे प्रमुख् पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. प्रो. (डॉ.) पांडुरंग भोसले, प्राचार्य, महात्मा फुले महाविद्यालय भूषवणार आहेत. उद्घाटन प्रसंगी मा. श्री. सतीश गोरडे, अडवोकेट , मुंबई उच्च न्यायालय हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सत्राच्या प्रमुख् वक्त्या म्हणून मा. डॉ. ममता वेर्लेकर, गोवा विद्यापीठ, गोवा यांना आमंत्रित करण्यात आले असून त्या भाषांतराच्या भूमिकेवर आपले विचार मांडणार आहेत.
मराठी विषयाच्या प्रथम सत्रामध्ये मा. प्रा. (डॉ.) प्रभाकर देसाई, मराठी विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तर द्वितीय सत्रामध्ये मा. प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, जिजामाता विज्ञान व कला महाविद्यालय, भेंडे हे विषय तज्ञ म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
हिंदी विषयाच्या प्रथम सत्रामध्ये मा. प्रा. (डॉ.) बाळासाहेब सोनवणे, हिंदी विभाग, प्रमुख, डॉ. अरविंद तेलंग महाविद्यालय, निगडी, पुणे व हिंदी अध्ययन मंडल सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तर द्वितीय सत्रामध्ये मा. प्रा. (डॉ.) नानासाहेब जावळे, सुभाष बाबुराव कुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, केडगाव व हिंदी अध्ययन मंडल सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे हे देखील विषय तज्ञ म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच इंग्रजी विषयाच्या प्रथम सत्रामध्ये मा. डॉ. भाग्यश्री वर्मा, सहयोगी प्राध्यापक, इंग्रजी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई तर द्वितीय सत्रामध्ये मा. प्रा. (डॉ.) आनंद हिप्परकर, इंग्रजी विभाग प्रमुख, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत हे इंग्रजी विषय तज्ञ म्हणून आपले विचार मांडणार आहेत.
त्याच बरोबर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या विषयाच्या शोध निबंधाचे सादरीकरण मा. प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, मराठी विभागप्रमुख, किसान वीर महाविद्यालय, वाई तर मा. डॉ. प्रमोद परदेशी,हिंदी विभागप्रमुख, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत तसेच मा. डॉ. गणेश वाघ, इंग्रजी विभाग प्रमुख, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर या विषय तज्ज्ञांच्या अध्यक्षते खाली होणार आहे.
परिषदेच्या समारोप कार्यक्रमासाठी मा. डॉ. स्वाती चड्ढा, (सामंजस्य करार सहयोगी, सी.एस.आय.आर.–एन.सी.एल., पुणे) यांना प्रमुख् पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. प्राचार्य प्रो. (डॉ.) पांडुरंग भोसले भूषविणार आहेत.
या राष्ट्रीय परिषदेमध्ये देशभरातील २२० पेक्षा अधिक संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत असून भाषांतर विषयावर विविध विचार आणि मते मांडणार आहेत. परिषदेतील निवडलेले सर्व संशोधन लेख नामांकित संशोधन नियतकालिकात प्रकाशित करण्यात येणार असून त्याची प्रत सहभागींना परिषदे दिवशी प्रदान करण्यात येईल.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) पांडुरंग भोसले, कला विद्याशाखेच्या उपप्राचार्या तथा परिषदेच्या समन्वयक प्रो. (डॉ.) कामायनी सुर्वे व आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. नीलकंठ डहाळे यांनी पत्रकार परिषदेत या राष्ट्रीय परिषदेची माहिती दिली.
राष्ट्रीय परिषदेत संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य प्रो. (डॉ.) पांडुरंग भोसले यांनी केले आहे.



