शबनम न्यूज | प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील निमसाखर या गावांमध्ये दत्त जयंती उत्साहात साजरी झाली. सकाळी दत्त मंदिरामध्ये श्री रामचंद्र नारायण महारनवर यांच्याकडून पादुकाला अभिषेक घालण्यात आला आणि दुपारी महादेव भजनी मंडळ निमसाखर यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्यानंतर बारा वाजता श्रीच्या चरणावर पुष्पवृष्टी झाली नंतर ग्रामस्था तर्फे महाप्रसाद देण्यात आला आणि संध्याकाळी सात वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली नंतर मंदिरामध्ये स्वामींची आरती व जप घेण्यात आला या कार्यक्रमाला निमसाखर मधील सर्व स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि अशोक शंकर होमकर यांच्या तर्फे महाप्रसाद देण्यात आला.



