शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी येथे ५, ६ आणि ७ डिसेंबर २०२५ रोजी होणारे ‘बाबानकशी’ प्रदर्शन हे महिला गृहिणी आणि महिला उद्योजकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना, हस्तकला, फूड प्रॉडक्ट्स, बुटीक, कला व उद्योजकतेला वाव देऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी हे व्यासपीठ एक उत्तम संधी आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना—
✔️ स्वतःच्या उत्पादन व कलेचा थेट प्रचार
✔️ ग्राहकांपर्यंत थेट पोहोच
✔️ व्यवसाय विस्तारासाठी उपयुक्त संपर्क
✔️ प्रेरणादायी वातावरणात नवीन संधी
✔️ स्वावलंबनाचा मार्ग अधिक मजबूत करण्याची संधी
अशा अनेक सुविधा लाभणार आहेत.
घे भरारीने आजवर केलेल्या यशस्वी प्रदर्शनांमुळे अनेक महिलांचे छोटे-मोठे व्यवसाय पुढे आले आहेत. यंदाचे प्रदर्शनही त्याच परंपरेला पुढे नेणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील सर्व महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रविंद्र यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाची विशेष उत्सुकता आहे.
आयोजक राहूल कुलकर्णी आणि नीलम एदलाबादकर यांनी सर्व महिला गृहिणी व उद्योजिकांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रदर्शन स्थळ : सीझन्स बँक्वेट्स, आकुर्डी, पुणे
दिनांक : ५, ६, ७ डिसेंबर २०२५
वेळ : सकाळी ११ ते रात्री ९
पिंपरी-चिंचवडच्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उद्योजकतेच्या दिशेने नवी वाटचाल सुरू करावी, असे आयोजकांनी नमूद केले आहे.



