spot_img
spot_img
spot_img

शेकडो दिव्यांग बांधवांनी घेतली मतदानाची शपथ आणि १००% मतदान करण्याचा केला निर्धार…

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आम्हीभारताचे नागरिकलोकशाहीवर निष्ठा ठेवून,याद्वारे प्रतिज्ञा करतो की,आम्ही आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्तनिःपक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्मवंशजातसमाजभाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येताकिंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू,” अशी शपथ दिव्यांग बांधवांनी अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप व्यवस्थापन प्रमुख तृप्ती सांडभोर यांच्या उपस्थितीत घेऊन येत्या महानगरपालिका निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार केला.

       पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त  समाज विकास विभागाच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेकडो दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मतदानाची शपथ घेतली,शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. 

      पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांच्या अधिपत्याखाली स्वीप उपक्रम राबविण्यात येत आहे,या उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांना मतदानाची शपथ देण्यात आली.

या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळेदिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुखमहानगरपालिकेच्या उप आयुक्त ममता शिंदेसहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गेजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिकदिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळेदत्तात्रय भोसलेराजेंद्र वाघचौरेसोनाली नवांगुळडॉ. विना तारकुंडेडाॅ.वीणा त्रिपाठी,संगीता जोशी,ब्रॅन्ड म्बेसिडर अक्षय सरोदे यांच्यासह शहरातील दिव्यांग बांधवत्यांचे पालकनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यांग नागरिकांचा मतदानातील सहभाग वाढावातसेच मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण व्हावेयासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. दिव्यांग मतदारांना सक्षमपणे मतदान करता यावेयासाठी महापालिकेकडून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मतदानासाठी दिव्यांग बांधवाना देण्यात येणाऱ्या सुविधा:-

१. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करणे.

 २. सक्षम प (Saksham App) च्या अनुषंगाने संबंधित अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.

 ३. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर रॅम्पव्हीलचेअर इ. अनुषंगिक सोयी सुविधा पुरविणे.

 ४. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांच्या मतदानासाठी तसेच स्वचतागृह येथे ने आण करण्याकरीता सहाय्यक उपलब्ध करून देणे.

५. प्राथमिक आरोग्य सुविधापोलिसअग्निशमन हेल्पलाइन२४×७ आरोग्य विभाग कक्ष.

 ६. मतदान कर्मचारी यांचेसाठी आवश्यक औषधेसुविधा पुरविणे.

 ७. आपत्ती संबंधित सर्व यंत्रणांशी संपर्क व समन्वय राखणे.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!