spot_img
spot_img
spot_img

शहरातील ‘या’ परिसरात मनपा अग्निशमन केंद्राची स्थापना करा – नाना काटे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी, पिंपळे गुरव, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे निलख, वाकड व सलग्न परिसरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने अग्निशमन केंद्राची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपा आयुक्तांना केली आहे. या मागणी संदर्भात निवेदन आयुक्तांना देण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड मधील सदर परिसरामध्ये एकही महापालिका अग्निशमन केंद्र उपलब्ध नसून दापोडी ते वाकड या संपूर्ण पट्ट्यामध्ये लोकसंख्या, बहुमजली निवासी प्रकल्प, व्यावसायिक संकुले, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, कोचिंग क्लासेस, पेट्रोल–CNG स्टेशन, LPG गोडाऊन, मल्टिप्लेक्स, हॉटेल व्यवसाय इत्यादी अत्यावश्यक व उच्च-जोखमीच्या घटकांची घनता लक्षणीयरीत्या वाढलेली आहे.

बीआरटी मार्ग, मेट्रो मार्ग, रेल्वे लाईन व कायमस्वरूपी वाहतूक कोंडीमुळे विद्यमान अग्निशमन केंद्राहून घटनास्थळी पोहोचण्यास अनावश्यक विलंब होतो. परिणामी आग, अपघात, पूर, जंगल, आग इत्यादी आपत्कालीन प्रसंगी नागरिकांच्या जीवित व वित्त सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या सर्व बाबींची दक्षता पाहता नाना काटे यांनी या सर्व भागात महापालिका अग्निशमन केंद्राची स्थापना करावी, अशी मागणी केली आहे.

सदर परिसरातील तातडीच्या प्राथमिकतेने महापालिका अग्निशमन केंद्र स्थापन करून आवश्यक कर्मचारी वाहने व उपकरणे उपलब्ध करून देणे आत्या आवश्यक असल्याचे यावेळी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!