spot_img
spot_img
spot_img

“उमलत्या कळ्यांचे आरोग्य व आहार” यावर प्रतिमा काळे यांचे मार्गदर्शन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी,पुणे ३५ या शाळेत नियमित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.आज,बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रशालेत उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला.तसेच इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थिनींना “उमलत्या कळ्यांचे आरोग्य व आहार या विषयावर शाळेतील शिक्षिका सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

मानसिक,शारीरिक,भावनिक स्वास्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी आहार,पुरेशी विश्रांती,झोप,व्यायाम किती गरजेचा आहे.कोणते पदार्थ खावेत?कोणते पदार्थ खाऊ नये?वैयक्तिक स्वच्छताचे महत्त्व,आईला मैत्रीण म्हणून आपल्या अडचणी सांगणे,तसेच आपल्या महिला शिक्षिकेला ही आपण आपल्या अडचणी सांगू शकतो,व्यक्त व्हायला शिकले पाहिजे,आनंदाने प्रत्येक गोष्ट स्वीकारता आली पाहिजे,यासाठी सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे.तो असेल तर असाध्य गोष्टही आपण साध्य करू शकतो.

मासिक पाळी दरम्यान कोणती काळजी घ्यायची?स्वच्छताचे महत्त्व,त्यासाठी आपल्या आरोग्याचे महत्त्व.पुरेसे प्रमाणात लोह मिळण्यासाठी काय खावे?कॅल्शियम कमी होवू नये यासाठी उपाय,त्याचप्रमाणे व्हिटॅमिन बी12,व्हिटॅमिन डी.ची आवश्यकता,त्याचा स्त्रोत या बाबत ही मार्गदर्शन केले.
शाळेचे संस्थापक माननीय श्री.गोविंदजी दाभाडे सर यांचे शिक्षकांना नियमित यासाठी मार्गदर्शन मिळत असते.शाळेतील शिक्षकांचे यासाठी सहकार्य लाभले.सौ.बनसोडे मॅडम,सौ.अस्मार मॅडम यांनी प्रास्ताविक केले,सौ. भालेराव मॅडम,सौ.सारिका आस्मर मॅडम यांनी आभार मानले,तर कोशिरे सरांनी फलकलेखन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!