spot_img
spot_img
spot_img

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना निवेदन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना उद्योजकांच्या सुरक्षेसह अन्य समस्यांविषयी निवेदन सादर करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे आयोजित या बैठकीत पोलीस विभागाच्या उद्योग सेलची बैठक संपन्न झाली. बैठकीला माननीय आयुक्त विनय कुमार चौबे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या खालील प्रमुख समस्या मांडल्या:

  • रात्रीच्या वेळेस वाढणाऱ्या चोरीच्या घटना
  • कामगारांना होणारे हल्ले व लूटमार
  • महिला कामगारांची छेडछाड आणि असुरक्षितता

एमआयडीसी परिसरात पोलीस गस्त वाढवणे, मनुष्यबळ मजबूत करणे आणि सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे प्रत्येक प्रमुख सिग्नलवर वाहतूक पोलीस तैनात करण्याची गरज असल्याचेही माननीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

या प्रसंगी फोरम तर्फे संपूर्ण सहकार्याची भूमिका व्यक्त करण्यात आली.

यावेळी वैभव जगताप – उपाध्यक्ष, शांतीलाल डांगी – संघटक, दुर्गा भोर – अध्यक्ष, महिला लघुउद्योजक संघटना, हर्षवर्धन लोखंडे – युवा उद्योजक संघटक आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदना नंतर माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तात्काळ संबंधित विभागांना निर्देश देत, औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षाविषयक उपाययोजना मजबूत करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. तसेच ज्या भागांत आवश्यकता आहे त्या ठिकाणी वाढीव मनुष्यबळ व गस्तीची अंमलबजावणी केली जाईल, अशी खात्री त्यांनी दिली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!