पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी :
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. या बाल दिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणी सदस्य सीमाताई चव्हाण यांच्या वतीने शाळेतील बाल विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. व सीमा ताई चव्हाण यांनी या लहान बालकांसमवेत बालदिन साजरा केला.
थेरगाव परिसरातील स्टार बर्ड्स स्कूल या ठिकाणी सीमाताई चव्हाण यांनी लहान बालकांना खाऊ वाटप केले तसेच त्यांच्यासोबत विविध खेळ खेळून बालकाच्या आनंदामध्ये सामील होऊन बालदिन साजरा केला.या स्कूलच्या संचालकांनी सीमाताई यांचे स्वागत केले त्यांचा सत्कार केला त्यांचे आभार व्यक्त केले.
सीमाताई चव्हाण या सध्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आगामी महानगरपालिका निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत, आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी त्या उमेदवार म्हणून इच्छुक आहेत, त्यानुसार त्यांनी आपली तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून थेरगाव परिसरातील या शाळेत बालकासमवेत बालदिन साजरा करत, विविध क्षेत्रात, विविध समाजातील घटकांशी आपले ऋणानुबंध कायम करत आहेत.
सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सीमाताई चव्हाण यांना या आगामी महानगरपालिकेत उमेदवारी मिळेल असा पूर्ण आत्मविश्वास असून भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले आहे.










