शबनम न्यूज | प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याची धमकी आणि त्यांच्या हप्तेचा कट रचत त्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार स्वतः जरांगे पाटील यांनी केली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आणि जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातील गेवराई मधून दोन संशयितांना ताब्यात घेतले. यावर मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या हट्टेचा कट कसा? कोणी शिजवला? यामागे कोण नेता आहे? हे मी पुराव्यासह पत्रकार परिषदेत घेऊन जाहीर करेल. तसेच ‘तू चुकीच्या ठिकाणी खेटलास’ असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला.
जरांगे पाटील यांचा नेमका रोख कोणाकडे? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. जिवे मारण्याची धमकी आणि हत्येचा कट त्यासाठी अडीच कोटींची सुपारी दिली गेल्याची तक्रार स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी जालनाचे पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेवराई मधून दोन संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
दरम्यान या प्रकरणावर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त करत कट शिजवणाऱ्यांना उघडं पाडणार असल्याचं म्हंटल आहे. अंतरवाली येथे माध्यमांनी जेव्हा जरांगे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, कोणी कट शिजवला? कसा शिजवला? कट शिजवणारा मुख्य नेता कोण? याचे सगळे पुरावे घेऊन आपण पत्रकार परिषदेत त्याचे नाव जाहीर करू, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.








