spot_img
spot_img
spot_img

आरपीआयच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी हिमाली कांबळे यांची निवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी माजी नगरसेविका हिमाली नवनाथ कांबळे यांची निवड करण्यात आली. पुणे शहर पदाधीकाऱ्यांच्या बैठकीत आज सर्वानुमते ही निवड करण्यात आली. या बैठकीला आरपीआयचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनावणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, भगवान गायकवाड, बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड, वसंत बनसोडे, शाम सदाफुले, महादेव दंदि, संदिप धांडोरे सुगन घसाडे व प्रमुख पदाधिकारी होते. आरपीआयचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनावणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहती दिली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!