spot_img
spot_img
spot_img

डुडुळगावमध्ये जुगार खेळणाऱ्या दहा जणांवर कारवाई

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. २५) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास डुडुळगाव येथे एसपी कॉलेजच्या मागील मोकळ्या जागेत करण्यात आली.

गोविंद बाबुराव धायगुडे (वय ४३), राहुल मुंजाजी चिलगर (वय २८), गणेश रामभाऊ पांचाळ (वय ३४), वाल्कीक वसंतराव कदम (वय ३०), सुभाष हरीश्चंद्र शिंदे (वय ३५), सचिन दगडू गायकवाड (वय ३५), विनोद काळुराम पगडे (वय ४०), सुनील महादेव शिंदे (वय ३८), विठ्ठल तुकाराम सलगर (वय २६) आणि चंद्रकांत हरीभाऊ तळेकर (वय ६६) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस अंमलदार उमेश दिलीप कसबे (वय २७) यांनी शनिवारी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी आपसांत संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोकळ्या जागेत तीन पत्तीचा जुगार खेळत असताना पोलीस अंमलदार कसबे यांनी त्यांच्यावर छापा मारून सर्वांना ताब्यात घेतले. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!